जेजुरी ः महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असून शनिवार ते सोमवार या दिवसांमध्ये भाविकांना जेजुरीत प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती जेजुरीते पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.
करोनाचा वाढत्या प्रादुर्भावचा विचार करून सोमवती यात्रा रद्द करण्यात आली असून पालखी सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी वरील तीन दिवसांत जेजुरी येऊ नयेत आणि व्यावसायिकांनीदेखील भाविकांना आपल्याकडे उतरून घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.. त्याचबरोबर गडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
मंगळवारी खंडोबा गडावर चंपाषष्टी उत्सव सुरू होत असल्यामुळे पाच दिवसांच्या काळात भाविकांना मुखदर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. चंपाषष्टीला प्रथा-परंपरेप्रमाणे पूजा केली जाणार आहे. मात्र, ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे उत्सावासाठी पाहुण्यांना बोलावू नका, अशाही सूचना देण्यात आली आहे.