हवेत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्यास भाजपामध्ये प्रवेश

0

लखनऊ ः सुधारित नागरिकत्व कायदा विरोधात शाहीनबाग येथे निदर्शने होत असताना कपिल गुज्जर याने युवकाने हवेत गोळीबार करून दहशहत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवकाला भाजपामध्ये बुधवारी प्रवेश देण्यात आला. त्यावरून भाजपा नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. ही बाब लक्षात येताच भाजपाने त्याचे सदस्यत्व रद्द आहे.

“बुधवारी बसपमधील काही युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामध्ये कपिल गुज्जरही होता. आम्हाला त्याचा शाहीनबाग प्रकरणात सहभाग असल्याची माहिती नव्हती. कपिल गुज्जर याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळताच काही वेळातच त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले”, असे माहिती उत्तर प्रदेशचे भाजपाचे सरचिटणीस जेपीएस राठोड यांनी दिली.

सीएएविरोधात निदर्शने सुरू असताना कपिलने हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे त्याने पक्ष सदसत्व स्वीकारले होते. कपिल गुज्जरने १ फेब्रुवारी रोजी हवेत गोळीबार करण्याची घटना समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. त्याने प्रक्षोभक भाषा वापरली होती. पोलीस बाजूला असतानाही त्याने हवेत दोन-तीन वेळा गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.