मुंबई : राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि.13) बदल्या केल्या होत्या. यामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या पदस्थापनेमध्ये आज बदल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आले असून या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीषक मनोज लोहिया यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज (शनिवार) शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार काढले आहेत.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे
1. अमिताभ गुप्ता (अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
2. मनोज लोहिया (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हूपर ते पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड.
3. रंजन कुमार शर्मा (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त (पूर्व) पुणे शहर.
4. सुहास वारके (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था,
पोलीस महासंचालक यांचे कार्यालय, मुंबई.
5. सुनिल फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर).
6. संजय मोहिते (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक,
महाराष्ट्र राज्य यांचे कार्य़ालय, मुंबई ते पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई)
7. सुरेशकुमार मेंडगे (पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार ते मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई)
8. संजय दराडे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई.
9. रविंद्र शिसवे (विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई ते पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई).