उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी

0

पुणे : उरवडे-पिरंगुट एमआयडीसीमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनी मालकाची न्यायालयाने मंगळवारी (ता. १५) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

निकुंज बिपिन शहा (वय ३९, रा. मयुरेश्‍वर अपार्टमेंट, सहकारनगर) असे कोठडी सुनावलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे.
सात जून रोजी एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला आग लागून त्यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी शहा  याचा दुबईत असलेला भाऊ केयूर बिपिन शहा (वय ४१) आणि वडील बिपिन जयंतीलाल शहा (वय ६७) यांच्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शहा याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. त्यास बचाव पक्षातर्फे ॲड. हर्षद निंबाळकर आणि ॲड. शिवम निंबाळकर यांनी विरोध केला. पोलिसांनी मागितलेली सर्व कागदपत्रे शहा यांनी दिले आहेत. ते तपासास सहकार्य करीत आहे, असा बचाव ॲड. निंबाळकर यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.