अधिवेशन सुरू होण्यापुर्वीच 32 जणांचा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

0
मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार होती. पण अधिवेशन सुरु होण्याअगोदर विधान भवनाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी प्रत्येकाला कोरोना टेस्ट करणे बंधनकारक होते.
त्यामुळे या अधिवेशनासाठी साधारणपणे ३ हजार पेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी, पोलीस सुरक्षारक्षक, प्रसारमाध्यम आमदार यांचा समावेश आहे. आतापर्यंत जी माहिती हाती आली त्यानुसार, तीन हजार पैकी ३२ लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी, पोलीस सुरक्षारक्षक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

ज्या आमदारांनी विधान भवनामध्ये टेस्ट केल्या होत्या त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर ज्या आमदारांनी व मंत्र्यांनी खाजगी लॅब मधून टेस्ट केल्या आहेत त्यांचा रिपोर्ट अजून आला नाही आहे. अशी माहिती विधान भवनाकडून देण्यात आली आहे. ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांना तात्काळ स्वतंत्र विलगीकरणात जाण्यास सांगितले आहे तसेच जर लक्षण दिसून येत असतील तर रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना विधान भवनाकडून देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.