मुंबई ः बाॅलिवुडची वादग्रस्त विधान करणारी आणि सोशल मीडियावर सतत ट्रोल होणारी कंगणा रानौत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कंगनाने स्वतः एक कविता शेअर केली आहे. तिच्या या कवितेला चाहत्यांकडून चांगलीच पसंती दर्शविली जात आहे. कंगना सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने एक कविता आपल्या आवाजात रेकाॅर्ड करत सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे.
कंगनाने हायकिंगशी प्रेरित होऊन ही कविता लिहिली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही कविता जरूर ऐका. तिची कविता अशी आहे, मेरी राख गंगा में मत बहाना। हर नदी सागर के साथ जाकर मिलती है। मुझे सागर की गहराइयों से डर लगता है। मैं आसमान को छूना चाहती हूं। मेरी राख को पहाड़ों पर बिखेर देना। जब सूरज उगे तो मैं उसे छू सकूं।”
सध्या कंगना बहिण रंगोली, वहिनी ऋतू आणि भाचा पृथ्वी यांच्यासोबत हायकिंगमध्ये एन्जाॅय करत आहे. इन्स्टाग्रामवर तिने तेथील फोटो शेअर केले आहेत. यापूर्वीदेखील तिच्या कविता खूप व्हायरल झालेल्या आहेत. कंगनाने नुकतेच थलाइवा या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. सत्य घटेनेवर आधारित हा चित्रपट आहे.