नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष आणि सीपीआईचे नेते कन्हैय्या कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, “ऐका साहेब, हे आंदोलक शेतकरी आहे, ती कुठली सरकारी संस्था नाही की उठलात आणि कुठल्यातरी भांडवलदाराजवळ तुटपुंज्या किमतीत विकायला आणि तारण ठेवायला.”
शेतकरी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. त्यात दिल्ली सरकारचेदेखील शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारने ट्वीट केलेले आहे. त्यानंतर त्यांनी सरकार टोमणा मारताना दुसरे ट्विट केले की, ”हा शेतकरी कुठे तुम्हा १५ लाख मागत आहे किंवा ते असंही म्हणत नाहीत की, आमच्यासाठी साडे आठ करोड रुपयांचे जहाज खरेदी करून द्या. फक्त इतकंत म्हणत आहेत की, ”शेतकरी कायद्यात फक्त एक ओळ लिहा की, एमएसपीतर्फे कमी किमतीत खरेदी केली जाणारी पिके, हा बाब बेकायदेशीर असेल.”
एक दिवस अगोदर कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकरावर निशाणा साधत लिहिले होते की, ”सरकार ऐकावं की, हे लोक शेतकरी आहेत. पिसाळलेल्या बैलाला नियंत्रणात आणायचं कसब त्यांच्याकडे असतं. यांना कोण भडकविणार! तुम्ही त्यांचे नुकसान होईल असे कायदे केलेले आहेत. आता बघा, हे शेतकरी तुम्हाला नियंत्रणात आणल्याशिवाय थांबणार नाहीत”