कर्नाटक ः कर्नाटक राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मगौडा यांचा मृतदेह चिकमंगलुरूच्या कडूरजवळील एका रेल्वेच्या पटरीवर मिळाला. त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटदेखील सापडलेली आहे. त्यांच्या निधनावर माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. देवेगौडा म्हणाले की, “राज्य विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस. एल. धर्मेगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकूण धक्का बसला. ते एक शांत आणि सभ्य व्यक्ती होते.”
सुत्रांनी कळलेल्या माहितीप्रमाणे त्यांचा एस. एल. धर्मेगौडा यांचा मृतदेह पहाटे २ वाजता मिळाला. आपली साधी प्रोफाइल ठवणारे ६४ वर्षांचे धर्मेगौडा नुकतेच कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते. कारण, विरोधी बाकावर असणाऱ्या काॅंग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांच्याशी चुकीचा व्यवहार केला होता. काॅंग्रेसच्या काही सदस्यांनी जबरदस्तीने त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून धर्मेगौडा यांना ओढून काढले होते. इतकेच नाही तर, त्यांच्यावर काॅंग्रेसच्या नेत्यांनी धर्मेगौडा यांच्यावर असा आरोप लावला की, सत्ताधारी भाजपासोबत मिळून वरिष्ट सभागृहाचे अध्यक्ष प्रतापचंद्र शेट्टी यांना बाहेर काढले. त्यामुळे भाजपा अध्यक्षाविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता आणि त्याच्यावर वरिष्ट सभागृहात मतदान होणार होता. तत्पूर्वीच ही घटना घडली आहे.
भाजपाने काॅंग्रेसच्या विधान परिषदेच्या काही सदस्यांना निलंबित करण्याची आणि या निर्माण झालेल्या गोंधळामुळे विद्यमान अध्यक्षांना बरखास्त करण्याच्या मागणी मोठा मुद्दा करून टाकला होता. धर्मेगौडा यांचे बंधू एस. एल. भोजेगौडा हेदेखील एसएससी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू होते.