कस्पटेवस्ती – वाकड परिसरातील स्वच्छता अभियान मोहिमेतून जनजागृतीचा संदेश
सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांनी घेतला पुढाकार
पिंपरी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त कस्पटेवस्ती – वाकड येथे स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. यानिमित्ताने झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील कचरा उचलण्यात आला. आणि बसस्टॉप परिसरात लावण्यात आलेली जाहिरात पत्रके काढून टाकण्यात आली.
छत्रपती चौक, कस्पटेवस्ती, वाकड या परिसरात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश सयाजी कस्पटे यांनी पुढाकार घेतला. यावेळी परिसरातील उद्योजक मोहन कस्पटे, अनिल कस्पटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
” एक कदम स्वच्छता की ओर भारत” असा संकल्प घेऊन “नागरिकांना ‘ स्वच्छतेतून समृध्दीकडे” असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न- कस्पटे
कस्पटेवस्ती परिसरातील आपण रहिवासी आहोत. आज प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटलेले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून “आपला परिसर स्वच्छ व सुंदर करुया” असा संदेश देण्यात आला असे सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांनी सांगितले.