मुंबई ः प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या भुमिकांमधून आला आहे. सध्या त्याचा खतरनाक लूक असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या आजारातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त पुन्हा आपल्या कामावर परतला आहे. संजय दत्त सध्या ‘केजीएफ-२’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी झाला आहे.
संजय दत्तने नुकतेच ‘भूज’ चित्रपटाचं काम पूर्ण केले आहे. आता केजीएफ २ साठी संजय दत्त हैदराबादमध्ये आहे. क्लायमॅक्स सीनसाठी कोळशाच्या खाणीत बरेच एक्शन सीनसाठी शूट होणार आहे. निर्मात्याने संजय दत्तला सांगितले होते. आणखी बाॅडी करण्याची आवश्यकता आहे. मात्र, संजयने त्याला नकार दिला आणि स्वतः एक्शन सीन दिले.
केजीएप-२चं शेवटचं शेड्यूल सुरू आहे. डिसेंबरमध्ये त्याचं शूटिंग संपणार आहे. कोणताही ब्रेक कमी घेऊन लागूपाठ संजय दत्त काम करत आहे. याच सेटवरील संजयचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्याचा खतरनाक लूक पाहून संजयचे चाहते प्रचंड काॅमेट्स देत आहेत.