खडसे म्हणाले,”ओलावा होता म्हणून तर…”

0

जळगाव ः ”राजकारणात एकमेकांकडे तोंड करून बसणारेदेखील नेते असतात. अशा परिस्थितीतही सर्वपक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संंबंध जपणारे नेते म्हणजे शरद पवार होय. त्यांनी साऱ्याच पक्षांशी सलोख्याचे संबंध ठेवेल आहेत”, असे कौतुकाचे शब्द राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काढले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये व्हर्च्यूअल रॅलीचे आयोजन केले होते. त्यात तो बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, ”किल्लारी भुकंपग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांनी उभे करण्याचे काम शरद पवारांनी ज्या कौशल्याने केले त्याला तोड नाही. समाजात असे लोक फार मोजके असतात. अनेक जण जन्माला येतात आणि मरूनही जातात. किती वर्षे जगले, या पेक्षा कसे जगले आणि काय कर्तृत्व केले, याला महत्व आहे”, असे खडसे यांनी सांगितले.

”राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आलो ते कुठेतरी ओलावा होता म्हणून आलो. चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. याचा आनंद आहे. पवारांनी माझ्यासारख्या अनेकांना संधी देऊन मोठा केले आहे”, असे कौतुक खडसे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.