किशोर आवारे खुनाचा ‘मुख्य सूत्रधार’ खळदे ५६ दिवसानंतर अटकेत

0

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे यांच्या खुनातील मास्टर माइंड माजी नगरसेवक चंद्रभान विश्वनाथ खळदे याला ५६दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरीचिंचवड पोलिसांच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (गुंडा स्कॉड) नेनाशिकमधून चंद्रभान ऊर्फ भानू खळदे याला ताब्यात घेतले.

जनविकास समितीचे संस्थापक किशोर आवारे याचा १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या तात्पुरते कार्यालय असलेल्याइमारतीत गोळ्या झाडून आणि डोक्यात कोयत्याने घाव घालून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडालीहोती.

पोलिसांनी या घटनेनंतर अवघ्या काही तासात मारेकरी शाम निगडकर, प्रविण धोत्रे, आदेश धोत्रे, संदीप मोरे, श्रीनिवास शिडगलयांच्यासह मनिष यादव आदी रेकॉर्डवरील सराईतांना अटक केली होती. तर त्यानंतर याप्रकरणात आवारे यांच्या खुनाची सुपारी दिलीम्हणून भानू खळदे याच्या मुलाचे नाव पुढे आल्याने गौरव चंद्रभान खळदे (२९) याला काही दिवसांनी अटक केली होती. दरम्यान, यासंपूर्ण प्रकरणात १५ वर्ष तळेगाव दाभाडे परिसरात नगरसेवक असणारा भानू खळदे हा फरार होता.

दरम्यान, भानू खळदे याच्या परवानाधारक पिस्तुलाची काडतुसे चोरीला गेल्याचेही तपासात उघड झाले होते. तर आरोपींनी अन्य काहीपिस्तुले आणि काडतुसे विकत आणून खून केल्याचे उघड झाले होते. परंतु, याप्रकरणात किशोर आवारे यांच्या मातोश्री आणि माजीनगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी फिर्याद देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचाभाऊ सुधाकर शेळके आणि अन्य दोघांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप केला होता. मात्र, तपासात ज्यांची नावे पुढे येतीलत्यांनाच अटक केली जाईल असे पिंपरीचिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर भानू खळदे हा मागील ५६ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आवारे खुनाचा तपास करण्यासाठी पिंपरीचिंचवडपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) ची स्थापना केली होती. यासह गुंडा स्कॉड, गुन्हेशाखायुनिट पाच आणि अन्य गुन्हेशाखेची पथके आरोपींच्या मागावर होती.

तर दुसरीकडे आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या नावाखाली, आवारे यांचा जवळचा सहकारी म्हणून मावळ पट्ट्यात परिचित प्रमोदसोपान सांडभोर या रेकॉर्डवरील सराईताने टोळी उभी करून आमदार शेळके यांच्या भावाच्या खुनाचा कट रचल्याची धक्कादायक बाबउघड झाली होती.

त्यामुळे एकूण आवारे प्रकरणात अन्य कोणाची नावे पुढे येतात याबाबत मावळ पट्ट्यासह संपूर्ण राज्यात कमालीची उत्सुकता पसरलीआहे. भानू खळदे याच्या कानशिलात आवारे यांनी लगावली होती. त्याचा राग मनात असल्याने गौरव खळदे याने मित्र असणाऱ्यांनाआवारे यांच्या खुनाची सुपारी देत हा सर्व प्रकार घडवून आणल्याचे पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

इंजिनिअर असणाऱ्या गौरव खळदे याला अटक केल्यानंतर भानू खळदे हा फरार झाला होता. त्यानंतर तो खंडाळा, दौड, हैदराबाद आणिकालांतराने नाशिक जिल्ह्यातील सिंधी कॉलनीत वास्तव्याला असल्याची माहिती गुंडा स्कॉडचे प्रमुख, सहायक पोलीस निरीक्षक हरिषमाने यांना समजली होती.

प्रविण तापकीर, सोपना ठोकळ, शुभम कदम हे गुंडा स्कॉडमधील पोलीस कर्मचारी भानू खळदे याच्यावर तांत्रिक विश्लेषणाच्यामाध्यमातून पाठलाग करीत होते. दरम्यान, भानू खळदे हा नाशिक येथे वास्तव्याला आल्याचे समजताच गुन्हेशाखेच्या उपायुक्त स्वप्नागोरे, सहायक आयुक्त सतीश माने, सहायक निरीक्षक माने यांच्यासह पथकाने खळदे याला अटक केली.

मारेकऱ्यांना पकडल्यावर गौरव खळदे याचे नाव पुढे आले होते. तर त्यानंतर भानू खळदे याचे नाव पुढे आले. पण याप्रकरणात अन्यकाही आरोपींची नावे नव्याने उजेडात येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचे स्पष्ट केलेआहे.

हि कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त परदेशी, उपायुक्त स्वप्नागोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरिष माने आणि त्यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.