मुंबई ः ”संजय राऊत यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या सरकारचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘आलं अंगावर की ढकल केंद्रावर’, ‘आलं अंगावर तर ढकल भाजपावर’, अशी टीका संजय राऊत आणि सरकार यांच्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लोकसत्ता डाॅक काॅमशी बोलताना केली.
उपाध्ये पुढे म्हणाले की, ”या सरकारला स्वतःचं कोणतं धोरण नाही. त्यांची कोणतेही काम करण्याची इच्छा नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणताही समन्वय नाही. प्रत्येक मंत्र्याची भूमिका वेगळी आहे. ना धोरण ना एकमत, असा प्रकार आहे. संजय राऊत यांचीही तिच भूमिका आहे. स्वतःच्या अपयशाचं खापर भाजपावर किंवा केंद्रावर फोडतात”, असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत यांच्या आरोग्याची काळजी करत केशव उपाध्ये यांनी राऊत लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. तसेच पुढे म्हणाले की, ”जनता हा मुद्दाच नाही, तर भाजपाला रोखणे, हा सरकारपुढे मुद्दा आहे. हे सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात रस नाही. सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा आभाव आहे. भविष्यात जे काही होईल ते सर्वांना दिसेलच”, असे ते म्हणाले.