कियारा मालदिवमध्ये करतेय एन्जाॅय

0

नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री कियारा अडवाणी समाज माध्यमातून खूपच सक्रीय असते. ती नेहमी आगळ्यावेगळ्या स्टाईलने बातम्यांमध्ये सतत चर्चेत असते. कियारा अडवणी सुट्टी घालविण्यासाठी मालदीवमध्ये गेलेली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रासोबत विमानतळवर दिसली होती. तेथील एक फोटोदेखील कियाराने मालदीवमधील शेअर केला आहे.

त्यामध्ये जंगलात उभी राहून पोज देत आहे. कियाराने फोटोमध्ये रेड आउटफिटमध्ये दिसून येत आहे. त्या लूकमध्ये ती जबरदस्त दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांच्या अनेक काॅमेंट्स येत आहे. तिचा हा फोटो लाखो चाहत्यांनी पाहिलेला आहे. आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लाईक्स तिच्या या फोटोला मिळालेल्या आहे.

बलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या आगामी चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’, कार्तिक आर्यनसोबत ‘भूलभूलैय्या २’ सहभागी आहे. कियारा अडवाणीचा तेलगू चित्रपट ‘भारत अने नेनू’ जास्त चर्चीत होता. या  चित्रपटात साऊथचा दिग्गज अभिनेता महेश बाबूसोबत कियारा दिसली होती. शाहिद कपूरबरोबर कबीर सिंह या चित्रपटापासून कियाराला लोकप्रियता मिळाली. अभिनेता अक्षय कुमारसोबतही कियारा लक्ष्मी बाम चित्रपटात दिसली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.