कोल्हापूर : धक्कादायक कोल्हापूर येथे संपूर्ण महाराष्ट्र्राला हादरुन सोडणारी घटना घडली आहे. नराधमांनी एका गर्भवती महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. यामध्ये नराधमांना साथ द्यायला असणाऱ्या दोन महिलांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
परप्रांतीय असणाऱ्या राम करण योगी, दिलीप योगी यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सप्टेंबर 2020 मध्ये संशयितांनी तिला आसाममधील ओळखीच्या ठिकाणी बोलावून घेतले. तिथे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले.
पीडित महिला बेशुद्ध झाल्यानंतर संशयितांनी तिला आसाममधील एका ठिकाणी नेले. मुलीला ठार करण्याची धमकी देत रामकरण याने लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडित महिलेला राज्यस्थानमध्ये आणून काही दिवस ठेवण्यात आले. तर सर्व संशयित काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेला घेऊन कोल्हापुरात आले.
कोल्हापुरात एका भाड्याच्या खोलीमध्ये संशयितांनी पीडित महिलेला डांबून ठेवले होते. दरम्यान पीडित महिला गर्भवती असल्याचे माहित असताना देखील रामकरण आणि दिलीप याने पीडितेवर बलात्कार केला.
पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.