अपहरण करुन तरुणाचा खून; मृतदेह आढळला नदी पात्रात

0
पिंपरी : तळवडे, रुपीनगर येथून अपहरण केलेल्या तरुणाचा खून झाला असून त्याचा मृतदेह शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत बेबडहोळ येथील नदी पात्रात सापडला आहे. एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (22, रा. रुपीनगर, तळवडे, मूळ- राजस्थान) असे अपहरण आणि खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील लक्ष्मण हुकमाराम चौधरी ( 47) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी योगेश दिनेश सावंत (22, रा. रुपीनगर), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (रा. चिंचेचा मळा, टॉवर लाईन रोड, तळवडे), रुपेश प्रकाश आखाडे (23, रा. शिवरकर चौक, त्रिवेणीनगर) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गुरुवारी रात्री घरी झोपला असताना टोळक्याने त्याला जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर सचिन दिवसभर घरी आला नाही, त्यामुळे पोलीस ठाण्यात नोंद केली. आज रविवारी सचिन याचा मृतदेह शिरगाव परिसरात सापडला असून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.