भरदिवसा ऑफिसमधून फिल्मी स्टाईल तरुणीचं अपहरण

0

पिंपरी : वेळ सकाळी साडे आकाराची…नेहमी प्रमाणे कार्यालयात कामकाज सुरु… अचानक एक तरुण कार्यालयात घुसला…हातातील पिस्तुल दाखवत दहशत पसरवली…काही समजण्याच्या अगोदर एका तरुणीला नेले…कार्यलयातील सहकार्यांनी तरुणीच्या घरी कळवले…घडलेला प्रकार पोलिसांना कळाला आणि मग सुरु झाली शोधाशोध…

हा धक्कादायक फिल्मी स्टाईल प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी सकाळी घडला. प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी शंतनू चिंचवडे (२५) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचे आणि आरोपी शंतनूचे काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप करत संबंध तोडले होते. यावरून शंतनू चिडला होता. त्यामधूनच त्याने तरुणीचे अपहरण केले.

अपहरणाची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी वेळ न घालवता तपासाची चक्रे फिरवली. यावेळी आरोपी तळेगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. अवघ्या सहा तासाच्या आत तरुणीची सुखरूप सुटका पोलिसांनी केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.