पिंपरी : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे 12 जून रोजी उघडकीस आलेल्या खुनाच्या गुन्ह्यात गुन्हे शाखायुनिट एकने दोघांना अटक केली आहे. भंगार विक्रीतून मिळालेल्या 700 रुपयांच्या वाटणीवरून चौघा मित्रांमध्ये वाद झाला त्यातचतिघांनी मिळून एका मित्राला दगडाने ठेचून ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे.
रवींद्र सिंह (रा. कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी जितेंद्रकुमार सुभाष भारद्वाज (28, रा. खरदाहानीलकंठ, ता. सलेमपूर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश), रवी सुखलाल गींधे (27, रा. यलदरी कॅम्प, ता. जिंतूर, जि. परभणी) यांना अटककेली आहे. त्यांचा एक साथीदार टिक्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हा फरार आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी मोशी येथील एका मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा मृतदेहआढळून आला. त्या व्यक्तीला दगडाने ठेचून ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मयत व्यक्तीची ओळख पटविण्यापासून तेआरोपींना अटक करण्यापर्यंत पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलिसांनी मयताची ओळख पटवून गुन्हे शाखा युनिट एकला या गुन्ह्याचासमांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या.
गुन्हे शाखा युनिट एकच्या दोन पथकांनी याचा तपास सुरु केला. मयत रवींद्र सिंह याच्या मित्रांनी त्याचा खून केला असून ते कुदळवाडीपरिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुदळवाडी परिसरात सापळा लावला. पोलिसांची चाहूललागताच आरोपी पळून जात असताना पोलिसांनी शिताफीने जितेंद्रकुमार आणि रवी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशीकेली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आणखी एका साथीदारासोबत मिळूनगुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीसउपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोषपाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, फारूकमुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांनी केली.
आरोपी आणि मयत हे फिरस्ती होते. रस्त्यावर दिसलेल्या भंगार वस्तू गोळा करून त्या विकण्याचे काम ते करीत होते. जून महिन्याच्यापहिल्या आठवड्यात मोशी परिसरात आलेल्या वादळात अनेक दुकाने आणि घरांवरील पत्रे उडाले होते. ते पत्रे गोळा करून चौघांनी एकादुकानात विकले होते. त्यातून त्यांना 700 रुपये मिळाले होते. ते 700 रुपये आपसात वाटून घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातूनचतिघांनी मिळून रवींद्र याचा दगडाने ठेचून खून केला.