तू माझे रक्त पिणार का, असे म्हणत तरुणाचा खून

0

पिंपरी: ‘मला तुझे रक्त प्यायचे आहे’ असे म्हणून मित्राने गळ्याचा चावा घेतला. याचा राग मनात धरून मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला. ही घटना संजय गांधीनगर झोपडपट्टी मध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

इस्ताक इनामुल खान (26, रा. संजय गांधीनगर, झोपडपट्टी, मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बिजानबी इनामुल खान (52) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल अप्पासाहेब लोहार (24, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. खामगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री राहुल लोहार इस्ताक खान हे मोशी येथील बनकर यांच्या शेतात बसले असताना इस्ताक याने राहुल याला ‘मला तुझे रक्त प्यायचे आहे’ असे म्हणून गळ्याला चावा घेतला. त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले. याचा राग राहुल याच्या मनात होता.

त्यानंतर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इस्ताक हा संजय गांधीनगर झोपडपट्टी मधील भीम ज्योत मंडळाच्या ओट्यावर झोपला होता. त्यावेळी तिथे राहुल आला. ‘तू माझे रक्त पिणार का, मी तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून त्याने इस्ताक याच्या डोक्यात दगड मारून खून केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.