नवी दिल्ली : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी आज भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यावर भाजप नेत्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटलं, उद्धव ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या बेनामी कंपनीला कंत्राट दिलं. 100 कोटींचा घोटाळा झाला. हा घोटाळा मी उघडकीस आणला त्यामुळे शिवसेनेच्या 100 गुडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. याच संदर्भात भाजपच्या गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, गिरीश बापट यांच्यासह मी आज केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली.
कोविड सेंटर घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि ज्याप्रकारे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासोबत मिळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही व्हिडीओ क्लिपिंग सुद्धा दिली आहे. मोठ-मोठे दगड फेकले जात आहेत आणि पोलीस मदत करत आहेत याची चौकशी करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले.