किस्सा सल्लूभाईचा… सलमानमुळे काजोलच्या वडिलांनी फिल्म बनविणे सोडून दिले

0

मुंबई ः तरुणांचा आवडता सल्लूभाई म्हणजेच आपला सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमान खानच्या आयुष्यातील कितीतरी किस्से चर्चेचा विषय होतात. आज असाच एक किस्सा काजोल वडिलांचा आणि सलमानसंदर्भात आहे. प्यार किया तो डरना क्या, या सिनेमातून काजोल आणि तिचे वडील शोमू मुखर्जी यांच्यासोबत सलमानने काम केलेले होते.

तर, किस्सा असा आहे की, १९९४ साली ‘संगदिल सनम’ हा सिनेमा शोमू यांनी तयार केला आणि त्यानंतर त्यांनी चित्रपट बनविनणे सोडून दिले. यामध्ये मनिषा कोईराला आणि सलमान मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा तयार झाला. प्रिमियर शोला सर्वजण आले. सिनेमा संपल्यानंतर सलमानला हा चित्रपट जास्त आवडला नव्हता. त्याने शोमू यांना सलमानने सरळ तोंडावर सांगितले की, तुम्ही सगळ्यात फालतू चित्रपट तयार झाला आहे. परिणामी, सिनेमाला वितरक मिळाला नाही. सिनेमा एकदमच फ्लाॅप गेला.

पुढे हा सिनेमा चालला नाही म्हणून त्या चित्रपटाच्या अपयशाचे खापर सलमान खानवर फोडले गेले. त्यानंतर मात्र, सलमान खानचेदेखील येणारे सगळे सिनेमे एका मागोमाग फ्लाॅप होत राहिले. शेवची सलमान आणि माधुरी दीक्षितचा ‘हम आपके हे कौन’ नावाचा सिनेमा सुपरहीट झाला. शेवटी हम आपके है कौन हा सुपरहीट सिनेमा झाल्यानंतर कोजालच्या वडीलांना त्यांची चूक लक्षात आली, आपल्यात चित्रपटात दोष होता, असे त्यांना लक्षात आले. आणि त्यांनी चित्रपट बनविणे सोडून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.