अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कोकणवासीयांनी अश्विनी जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे : आमदार नितेश राणे
पिंपरी : महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजूनकाढला. मतदारसंघात वास्तव्याला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचूनत्यांच्याशी संवाद साधला. तसेच सांगवी येथे झालेल्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी विजयीकरण्याचे आवाहन त्यांनी कोकणवासीयांना केले.
आमदार निलेश राणे यांनी काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवडगाव सांगवीसह मतदारसंघातील अन्य भागात जाऊन सिंधुदूर्गजिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील नागरिकांशी संवाद साधला. काही भागात त्यांनी पदयात्राही काढली. तसेच सांगवीमध्येझालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात कोकणवासीयांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचेअध्यक्ष अजय पाताडे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, सुनील पालकर, ऍड. चंद्रकांत गायकवाडयांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार निलेश राणे म्हणाले, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न पाहून ते सत्यातउतरवण्याचे काम केले. त्यांनी या मतदारसंघाचा कायापालट केला. मतदारसंघातील अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठीकोकणवासीयांनी त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे. शहरातील कोकणवासीयांच्या समस्यासोडवण्यासाठी भाजप पक्ष कटिबद्ध आहे.