पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के आर टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासहतिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनीचोरीचे दागिने घेणाऱ्या तीन सोनारांना देखील आरोपी केले आहे.
किरण गुरुनाथ राठोड (26, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सुर्यवंशी (19, रा. कोरेगाव भीमा), संतोश जयहिंद गुप्ता (18, रा खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून घरफोड्याकरणारा केआर टोळीचा म्होरक्या दिघी परिसरात ओळख लपवून वास्तव्य करीत आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकातील दिवंगतपोलीस अंमलदार राजेश कौशल्ये यांना मिळाली. त्यानुसार दिघी परिसरात सापळा लावून किरण राठोड याच्यासह तिघांना ताब्यातघेतले. त्यांच्याकडून एक कार, 187 ग्रॅम सोने, एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 12 लाख 11 हजारांचा मुद्देमालजप्त केला.
आरोपी किरण राठोड हा पाच घरफोड्या आणि एक दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींनी चोरलेले दागिने कोरेगाव भीमा येथीलदोन आणि परभणी येथील एका सराफ व्यावसायिकाला विकला. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या तीनही सराफव्यावसायिकांना देखील आरोपी केले आहे. तसेच दागिन्यांची विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी आरोपीकेले आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्नागोरे, सहायक आयुक्त सतिश माने, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समिर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीनलोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे, औदुबर रोंगे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.