कर्नाटक ः ”भारतीय जनता पार्टीसोूत असतो, तर आतापर्यंत पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. काॅंग्रेससोबत आघाडी करून जे काही कमवलं होते, ते सगळं संपलं”, अशा शब्दांत कर्नाटक माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युरलचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी काॅंग्रेसवर संताप व्यक्त केला.
मैसूरमधील एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी विधान केले. ते म्हणाले, ”भाजपाबरोबर संबंध चांगले ठेवले असते, तर मी आतादेखील मुख्यमंत्री असतो. मी १२ वर्षांच्या काळात मी जे काही मिळवलं होते. ते सगळं काॅंग्रेससोबत आघाडी करून सगळं संपवून टाकलं. २०१८ मध्ये काॅंग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धारामैय्या आणि त्यांच्या समर्थकांनी माझी प्रतिष्ठा संपवून टाकली”, अशी खंत कुमारस्वामींनी व्यक्त केली.
२०१८ मध्ये काॅंग्रेस आणि जनता दल सेक्यलरने आघाडी करून सरकार स्थापन केलेलं होतं. त्यावेळी कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेडीएस आणि काॅंग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आणि काही आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे कुमारस्वामींचे सरकार कोसळले.