”लग्नाचं वचन देऊन दीर्घ काळ केलेला सेक्स हा बलात्कारचं, असं नाही”

दिल्ली उच्च न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळत दिला निर्णय 

0

नवी दिल्ली ः लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध ठेवणं म्हणजे बलात्कारचं असं नाही, असा असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने एक केस संदर्भात मांडलेले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एका महिलेने लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीच्या सुटेकला आव्हान देत याचिका दाखल केलेली होती. न्यायालयाने तिची याचिक फेटाळत हा निर्णय दिला आहे.

”लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध ठेवण्याला बलात्कार म्हटलं जाऊ शकत नाही. जर, संबंधित महिला दीर्घ काळापासून त्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असेल”, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने सुणावणी दरम्यान दिली.

न्यायाधीश विभू बाखरू म्हणाले की, ”जर पीडिता काही क्षणात शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचं अमिष दाखवून संबंध ठेवल्याचं आपण म्हणू शकतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचं वचन देऊन महिलेला शरीरसंबंध ठेवण्यास प्रेरित करु शकतं, असंही त्यांनी स्पष्ट करू शकतं.”

”अशा प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचं आपण म्हणू शकतो. कलम ३७५ अंतर्गत तो गुन्हा ठरू शकतो. पण, जेव्हा दीर्घ काळासाठी शारिरीक संबंध ठेवले गेले असतील तेव्हा ते ऐच्छिक आणि लग्नाच्या हव्यासापोटी ठेवण्यात आल्याचं सिद्ध होतं”, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने मांडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.