लक्ष्मी पूजन : IAS अधिकार्‍याच्या घरातील दीड किलो सोन्याचे दागिने चोरीला

0

पुणे :  देशासह राज्यात मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाचा फटका एका IAS अधिकाऱ्याच्या कुटुंबाला बसला आहे. चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेलं तब्बल दिडशे तोळे सोने आणि अडीच लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना पुण्यात मुंढवा परिसरात घडली आहे. सेवानिवृत्त अधिकार्‍याचा मुलगा आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये आहे अशी माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे (64, रा. ज्ञानेश्वरी बंगला सर्व्हे नं. 55, प्लाूट नं. 24, डेक्कन पेपरमिल रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून मोठया पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरूवारी लक्ष्मी पूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी घरातील जवळपास सर्वच पारंपारिक दागिने पूजनामध्ये ठेवले. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट आणि रोख रक्कम 2 लाख 50 हजार रूपयांचा समावेश होता. एकुण 150 तोळे वजनाचे दागिने आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज पुजनामध्ये ठेवण्यात आला होता.

डोईफोडे यांचे घर गुरूवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटयाने  बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून व हॉलचे खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. आणि पूजनामधील सर्व दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. 

Leave A Reply

Your email address will not be published.