जमीन प्रकरण; पुन्हा नव्याने होणार एकनाथ खडसे यांची चौकशी

0

पुणे : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यामुळे खडसे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १८ महिन्यांपूर्वीच एसीबीने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.

आता नव्याने चौकशी करून एसीबी काय उकरून काढणार? ही चौकशी म्हणजे आपला छळ आहे, अशा शब्दांत खडसे यांनी टीका केली आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुणे अँटिकरप्शन ब्युरोने कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर २०१८ मध्ये एसीबीनेच त्यांना ‘क्लीन चिट’ दिली. मात्र, राज्यात सत्तापालट होताच पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

याप्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. अँटिकरप्शन विभागाच्या वतीनेदेखील दोन वेळा चौकशी झाली. १८ महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तरीही अँटिकरप्शनकडून पुन्हा नव्याने चौकशी करून यात काय तथ्य काढणार आहे, असा सवाल खडसे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.