माजी आमदार गणपतराव देशमुख यांना अखेरचा ‘लाल सलाम’

0

सांगोला : सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे, अमर रहे, आबासाहेब अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. दुपारी पावणेतीन वाजता ज्येष्ठ मुलगा पोपटराव देशमुख मुखाग्नी दिला. याप्रसंगी चंद्रकांत देशमुख यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

शुक्रवारी (30 जुलै 2021) रात्री उशीरा सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण सांगोला तालुक्‍यात हळहळ व्यक्त करण्यात आली. शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात आणण्यात आले. दरम्यान पंढरपूर – सांगोला रस्त्यावर त्यांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
भाई गणपतराव देशमुख यांच पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला कार्यकर्ते नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. अंत्यदर्शनासाठी गणपतराव देशमुख यांचे पार्थिव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठेवण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे, भाई गणपतराव देशमुख अमर रहे”च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
गणपतराव देशमुख यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. फुलांनी सजवलेल्या ट्रक मधून गणपतराव देशमुख यांची अंत्ययात्रा निघाली. शेतकरी सहकारी सुत गिरणीच्या मैदानवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातील नेतेमंडळींनी येथे उपस्थिती लावली. येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे दुष्काळग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोठे काम आहे. नव्या पिढीला त्याच्या कार्याची माहिती व्हावी, त्यांचे लोकाभिमुख कार्याचा गौरव, आठवण राहण्यासाठी राज्यशासनाने गणपतराव देशमुख यांच्या नावाने दुष्काळी भागासाठी मोठी विधायक योजना सुरू करावी अशी मागणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी श्रद्धांजली सभेत केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
Leave A Reply

Your email address will not be published.