मारुंजी गावच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

0

हिंजवडी : ‘आयटी पार्क’ला लागून असणाऱ्या मारुंजी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ केला. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या हातात सत्ता देऊन विकासाला साथ देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी केला आहे.

जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे जया बुचडे, अर्जुन बुचडे, कावेरी बुचडे, दत्तात्रय बुचडे, शकुंतला चव्हाण, विश्र्वंबर वाघमारे, प्रणोती कांबळे, तानाजी वाघमारे, प्रीती जगताप, विकास जगताप, पुजा पवार, दत्तात्रय सुतार, हेमलता जगताप या युवा पिढीतील उमेदवार संधी दिली आहे. तसेच सर्वच उमेदवार उच्च शिक्षित असल्याने नवीन पिढीला गावचा विकास करता येणार आहे.

सर्व उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावच्या विकासासाठी खासकरून महिलांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी? याकडे विशेष लक्ष दिले जाईल अशी ग्वाही दिली. प्रशस्त रस्ते, चोवीस तास विज, शिक्षणासाठी आद्यवात सुविधा असणारी हायटेक शाळा, स्वच्छ आणि सुंदर गाव या मुलभूत गरजा पूर्ण करुन त्याच बरोबर गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी नवीन योजना प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करून त्यातुन रोजगानिर्मिती करु असे आश्वासन दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, राघूजी बुचडे, आप्पासाहेब बुचडे, शंकर बुचडे, अमोल बुचडे, संतोष बुचडे, सुधीर बुचडे, सुखलाल महाराज बुचडे, बाबासाहेब बुचडे, मच्छ शिंदे, प्राचिताई बुचडे, बाजीराव जगताप, दशरथ जगताप, गावातील ज्येष्ठ नेते, प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने महिला, तरूण वर्ग उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.