सिंबायोसिस विधी महाविद्यालयात ‘कच्च्या कैद्यांचे अधिकार ‘ विषयावर व्याख्यानमाला

0

पुणे :

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत  विद्यापीठाच्या सिंबायोसिस विधी महाविद्यालय , पुणे  येथील  कायदा सहाय्य्य आणि जनजागृती विभागाच्या  माध्यमातून 8 ऑक्टोबर २०२१  रोजीकच्च्या कैद्यांचे अधिकारया विषयी  व्याख्यानमाला आयोजित करणेत आली.  हाकार्यक्रम  जिल्हा कायदेशीर सहाय्य केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आला. सध्या सुरू असलेल्याआजादी का अमृतमहोत्सवया राष्ट्रीय कायदेशीर सहाय्य  केंद्राच्या  प्रेरणेतून  हा कार्यक्रम  दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण कॉलेज येरवडायेथे आयोजित करण्यात  आला होता.

 

तुरुंग अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. पुणे जिल्हा कायदेशीर सहाय्य केंद्राचे सचिव श्री प्रतापसावंत,  श्री सुनील धमाल,  (अतिरिक्त पोलीस अधिकारी ) प्राचार्य श्री शरद खटावकर  (दौलतराव जाधव तुरुंग प्रशिक्षण केंद्र)  यांच्यासोबत सिम्बायोसिस कॉलेजचे प्राध्यापक  शिरीष   कुलकर्णी , प्राध्यापक डॉ. आशिष देशपांडे,  प्राध्यापक योगेश धरणगुत्ती,  प्राध्यापक आशुतोष पंचभाई , प्राध्यापक संग्राम चव्हाण,  प्राध्यापक डॉ . आत्माराम शेळके,  प्राध्यापक आदिती माने आणि चैत्रiलीदेशमुख यांचे मार्फत व्याख्याने देण्यात आली देण्यात आली.

चैत्रiली देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले आणि श्री शरद   खटावकर मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला . त्यानंतर प्रा . शिरीषकुलकर्णी यांनी कच्च्या कैद्यांचे अधिकार   विषयी व्याख्यान दिले.  तसेच  सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाचे विविध प्रकारच्यासामाजिक  कायदेशीर  उपक्रमावरती  प्रकाश टाकला .   वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या  लोक आदालत  , कच्य्या कैद्यांना मोफतकायदेशीर मार्गदर्शन आणि कायदेशीर  सहाय्य्य  क्लिनिक याविषयी मार्गदर्शन केले.    खेड्यापाड्यांमध्ये देखील कायदेशीर  जणजागृती निर्माण करणे चा उद्धेश्यही त्यांनी नमूद केला .

यानंतर श्री प्रताप  सावंत ( सचिव, पुणे जिल्हा कायदेशीर साहाय्य केंद्र) यांनी तुरुंग अधिकारी आणि पोलीस यांच्यातील संवादाचेमहत्त्व नमूद केले.  तसेच  पॅन इंडिया  मुव्हमेंट , कायदेशीर  जनजागृती कार्यक्रम  याविषयी  माहिती दिली.  भारताने  सुधारणावादीन्याय व्यवस्था अवलंबिले आहे त्यामुळे त्यांना ते सुधारतील अशीच वागणूक  तुरुंगात मिळावी अशी iशा व्यक्त केली.  तसेच मोफतकायदेशीर  सहाय्य्य  हा  मार्गदर्शक तत्त्वांमढील महत्वाचा घटक आहे  असेही ते म्हणाले .  कोरोना काळातील महामारीमध्ये मध्येविविध ठिकाणहून सतराशे कैद्यांना जामिनावर सोडलेले आहेआणि महाविद्यालयातील कायदेशीर सहाय्य केंद्रे आणि निमसरकारीसंस्था यांनी त्या कैद्यांना जामीन दिला आहे असे त्यांनी स्पस्ट केले . यावेळी कैद्यांची स्वातंत्र्य देखील शाबूत ठेवले आहे जेणेकरून तेकैदी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये मिसळावेत .  

प्रा. संग्रामजीत  चव्हाण , सिम्बायोसिस विधी महाविद्यालय  यांनी   नवीन कैदी आणि सराईत कैदी यांना एकत्र  ठेऊ  नये   तसेच   कैद्यांच्या सुधारणे साठी  योग्य वेळीच  पावले उचलली जावीत, जेणेकरून त्यांना समाजामध्ये लवकर मिसळता येईल हे स्पष्ट केले. श्रीसुनील ढमाळ यांनी कैद्यांचे विविध प्रश्न ,  तुरूंग प्रशासनावर येणारा ताण आणि त्या वरती उपाय यावर मीमांसा केली तसेच कैद्यांनामिळणारी मोफत कायदेशीर सहकार्य यावरही भाष्य केले.  त्यानंतर डॉ. आत्माराम शेळके यांनी जागतिक दर्जाच्या चांगल्या चांगल्या पद्धती वापराव्यात आणि तुरुंग प्रसंशनमध्ये  कशा सुधारणा आणता येईल हे नमूद केले.   शिक्षा अमानवी नसाव्यात हे देखील त्यांनीस्पष्ट केले .  भारतीय संविधानाच्या परीक्षेत 21 मध्ये जरी संरक्षण दिले असले तरीदेखील  कायदेशीर प्रक्रीयेनुसारच   कारवाई केली   पाहिजे असे ते म्हणाले.  

प्राध्यापक शिरीष कुलकर्णी यांनी देखील परदेशातील घेण्यासारख्या पद्धती , कैद्यांचे पुनर्वसन   ओंबुडसमन सिस्टीम आणि राष्ट्रीयमानव अधिकार आयोगाकडून  होणाऱ्या तपासण्या यावर भाष्य केले. प्राध्यापक डॉ. आशिष देशपांडे यांनीदेखील जागतिक दर्जावरविशेषत: युरोपमधील चांगल्या बाबींवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्राध्यापक योगेश धरणगुत्ती यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सटेक्नॉलॉजीचा वापर करून जर कैद्यांच्या वर्तणुकीवर   निरीक्षण ठेवता येईल यावर मीमांसा केली .  शेवटी प्राध्यापक आशुतोष पंचभाईयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध  निवाडे आणि कायदेशीर तरतुदी यावर  चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य शरद खटावकर यांनी  मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.