पिंपरी : ‘भष्ट्राचारी भाजप चले जाव’, ‘अबकी बार सौ के पार’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावर आज (दि.18) भव्य मोर्चा काढण्यात आला. पदाधिकारी-कायकर्ते चिंचवड स्टेशन येथील चौकात जमले. त्यानंतर आंदोलकांनी महापालिकेच्या दिनेशे कूच केली.
यावेळी नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, प्रवक्ते व निवडणूक प्रभारी योगेश बहल, मंगला कदम, सुलक्षणा धर, नाना काटे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, वैशाली काळभोर, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, यश साने, जालिंदर शिंदे, विकास साने, संदीप पवार, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विराज लांडे आदी उपस्थित होते.
चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकरी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची लूट केली असा, आरोप यावेळी राष्ट्रवादी पदाधिका-यांनी केला.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा मोर्चा म्हणजे भ्रष्टाचारावर हल्लाबोल आहे. महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवून त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांच्या हाती सत्ता आणायची आहे. राष्ट्रवादीने सत्ता असताना सर्वसामान्य लोकांची कामे केली. महापालिकेत विरोधी पक्षात असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधिनी महापालिकेत मांडले. सत्ताधारी भाजपाने इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले, पाणी पुरवठा नियोजनात अपयश आले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील लोकांना स्वतःच्या बगलबच्चना ठेका देऊन पैसे लाटले, चुकीचा वाढीव खर्च दाखवून निवडणुकांचा फ़ंड गोळा केला, विद्यार्थ्यांच्या गुडफिल किट मध्ये देखील पैसे खाल्ले अशा एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. त्या बाबत मी सातत्याने आवाज उठवून उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडीच्या संबंधित मंत्र्यांकडे देखील पाठपुरावा केला आहे.
आता एकजुटीच्या ताकदीवर तसेच पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीला सत्तेत आणू आणि या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून पायउतार करु, असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. त्यासाठी महिला, युवक, युवतींनी सज्ज होण्याचे आवाहन लांडे यांनी केले.
चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकरी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची लूट केली असा, आरोप यावेळी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केला.
या मोर्चा मुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. खूप दिवसानंतर असा भव्य मोर्चा शहरवासियांना अनुभवता आला.