महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर टीका करताना पातळी घसरतेय : शरद पवार

0

पुणे:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषमंत्री शरद पवार यांनी राजकारण्यांचे चांगलेच कान टोचले. सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय आणि दिलगिरी व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ येते, अशा शब्दात शरद पवारांनी राजकीय नेत्यांना कान पिचक्या दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती आहे.किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते, असं शरद पवार म्हणाले.

मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते.

खासदार संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटलांवर शेलक्या शब्दात समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी भाषण सुरू केले असता प्रमुख मान्यवरांची नावे घेत असताना खेड विधानसभा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नाव घेताच उपस्थिता मध्ये एकच हशा पिकाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.