पुणे : आई-वडीलांचा आधार गमावल्याने आजीकडे राहत असलेल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करणा-या ४५ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा निकाल दिला.
आनंद पवार (४५) असे शिशा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्च ते डिसेंबर २०१६ दरम्यान हा प्रकार घडला. पिडीत मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तर तिचे वडील मनोरुग्ण असल्याने ते घरातून निघून गेले आहेत. त्यामुळे ८० वर्षाची आजी तिचा संभाळ करीत आहे. पवार हा आजीच्या घरी गेल्या १० वर्षांपासून भाडेकरून म्हणून राहत होता. त्याची पत्नी, मुले त्याच्या मुळगावी असल्याने तो एकटाच तिथे राहत.
खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्ना सांवत यांनी केला. त्यांना पोलिस कर्मचार गंगाधर नार्इकरे आणि पोलिस हवालदार सुषमा पाटील यांनी मदत केली. आरोपी हा पिडीत मुलीशी विवाह करण्यासाठी तयार होता. मात्र दोघांच्या वयातील अंतर, आरोपीने पिडीत मुलीचा घेतलेला गैरफायदा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.