नवी दिल्ली : राज्यात लॉकडाऊनच्या प्रतिबंधामध्ये शिथिलता येत आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रांत नवीन व्हर्जन (मॉडल्स) लाँच करण्याची तयारी सुरु झाल्या आहेत. भारतात पुढील आठवड्यात दोन जबरदस्त कार (Hyundai Creta) लाँच होणार आहेत.
मर्सिडीज बेंझ एस क्लास
Mercedes-Benz S-Class कंपनीची फ्लॅगिशप कार आहे. या कारचे आता नेक्स्ट जनरेशन मॉडल भारतात लाँच होत आहे. कंपनी 17 जूनला ते सादर करेल.
कंपनी हे मॉडल भारतातच असेम्बल करणार आहे.
मात्र, सुरुवतीला कंपनी ते इम्पोर्ट करणार आहे.
ही कार 3.0L इंजिनसह येते जी 282bhp पॉवर आणि 600Nm टॉर्क जनरेट करते.
या कारची प्रारंभिक किंमत 1.5 कोटी रुपये आहे.
मागील जनरेशन मॉडलपेक्षा नवीन मॉडल 34 एमएम लांब, 51एमएम रूंद आणि 12 एमएम उंच आहे. व्हीलबेस वाढवून 50 एमएम केला आहे.
हुंदाई अल्काझार
Hyundai Alcazar SUV कंपनी पुढील आठवड्यात 18 जूनला सादर करेल. या कारसाठी 25,000 रुपयांच्या टोकन मनीसह प्री-बुकिंग सुरू झाले आहे.
हुंदाई अल्काझार कंपनीची पॉप्युलर कार हुंदाई क्रेटावर (Hyundai Creta) अधारित असेल. तिची स्टाईल पूर्णपणे क्रेटासारखी आहे. हिचे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन 115 पीएस मॅक्झिमम पॉवर जनरेट करेल. तर तिचे 1.5 लीटर टर्बो-डिझेल इंजिन 138 बीएचपी आणि 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 115 पीएसची मॅक्झिमम पॉवर निर्माण करेल. तिच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड मिळू शकते.