लॉकडाऊन असताना हॉटेलमध्ये दारु विक्री, मालकासह 41 जणांवर कारवाई

0

पुणे : लॉकडाऊनची संचारबंदी असतानाही हॉटेलमध्ये तब्बल 39 ग्राहक मद्य पिताना आढळले. भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेल साई गार्डनवर छापा टाकून हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांसही 41 जणांवर कारवाई केली. येथून मद्यपींच्या 25 दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी व 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजय दुधाळे व शिंदे कात्रज परिसरात पेट्रोलिंग करत असताना मांगडेवाडी फाटा येथील साई गार्डन या हॉटेल समोरील पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केल्या असल्याचे दिसून आले.

संशयावरून आतमध्ये पाहिले असता हॉंटेल मध्ये काही लोक मद्य पित बसले होते. तपास पथकातील पोलिसांनी हि माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना कळविली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी ताबडतोब पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक घावटे यांच्यासह अधिकचे कर्मचारी पाठवून हॉटेलवर छापा टाकला.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक पोलीस निरीक्षक घावटे, पवार , पोलीस अंमलदार श्रीधर पाटील, परशुराम पिसे, राजु वेगरे, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर, प्रणव संकपाळ यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.