पिंपरी : शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी गर्दी करणे टाळणे आवश्यक आहे. मात्र लॉकडाउन, जनता कर्फ्यूबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. उद्याच्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू नसल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये; अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी दिला होता. तसेच शनिवार, रविवारी जनता कर्फ्यू करण्याचे संकेत दिले होते.
याबाबत पत्रकारांनी विचारले असता महापौर उषा ढोरे म्हणाल्या , ”शहरातील नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. स्वयंशिस्त पाळावी. लॉकडाउन, जनता कर्फ्यूबाबत अचानक कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. नागरिकांचे हाल, नुकसान न करता निर्णय घेण्यात येईल. याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. उद्याच्या शनिवारी आणि रविवारी जनता ‘कर्फ्यू’ नाही”.