मुंबई ः बाॅलिवुडमधील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री दिलीप कुमार यांचा जोश पहिल्यासारखा राहिले नसेल मात्र, दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांचे प्रेम आजही तसेच आहे. दिवसरात्र आपल्या पतीची सेवा करण्यात सायरा बानो व्यस्त असतात. येत्या ११ डिसेंबरला दिलीप कुमार यांचा ९८ वा वाढदिवस आहे.
सायरा बानो म्हणतात की,”दिलीर कुमार यांची तब्येत वयानुसार कमजोर होत चालली आहे. त्यांची रोग प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आता ते जास्त कोणाला भेटूदेखील शकत नाहीत. कारण, करोना संक्रमणाची भीती आहे.” दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या प्रेमाचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत.
एक किस्सा असा की, ‘परदेशातून आलेल्या सायरा बानो यांना भेटण्यासाठी दिलीप कुमार दररोज रात्री विमानाने चैन्नईला येत जात असत आणि पुन्हा सकाळी विमानाने शुटिंगसाठी परत जात. जेव्हा सायरा यांनी पहिल्यांदा चारचाकीमधून फिरवण्यासाठी जायचे होते, तर त्यांच्या सायरा यांच्या घरातील लोकांची परवानगी मागितली होती. नंतर त्यांना सायरा यांनी लग्नासाठी विचारले, तेव्हा सायरा यांना वाटले की, ते फक्त मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत.’
१९६६ साली त्यांनी लग्न केले. त्याकाळी ही लग्न करणाऱ्यांसाठी आदर्श ठरली होती. कितीही अडचणी आल्या मात्र दोघांनी त्यावर मात केली आणि आपले प्रेम कमी होऊ दिले नाही. त्यांच्या अपार प्रेमत्वाला पाहूनच त्यांचे चाहते आजही दिलीप कुमार यांनी दिर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करतात.