नवी दिल्ली : योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी M Yoga App चे उदघाटन करत वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून हे app तयार केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना म्हटलं की, जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा त्यामागे संपूर्ण जगाला योगा सहजपणे माहिती व्हावा हीच भावना होती.
आता जगाला M Yoga अॅपची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील असंही मोदींनी म्हटलं आहे.
भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबत मिळून एक महत्त्वाचं पाऊल उचललं असल्याचं प्रतिपादन मोदींनी केलं.