महाआघाडी सरकारमधील मंत्र्याच्या जिवाला धोका

वाचा सविस्तर काय आहे प्रकार...

0

मुंबई : बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघाना अटक केली आहे. तासात हे दोघे जादूटोना करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी महाआघाडी ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केला असल्याचे समोर येत आहे.

कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. पोलीस या दोघांनी कोणाचा सांगण्यावरून हा प्रकार केला आहे, या मागचा नेमका हेतू काय आहे याचा कसून तपास करत आहेत. विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावलीमध्ये हा सर्व प्रकार चालू होता. एका घरात तांदळात शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवत अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांच्या जिवाल धोका किंवा त्यांना शरीराला जीवघेण्या जखमा होण्यासाठी या अघोरी प्रथेचा वापर केला गेला आहे.

शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आहे. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.