नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरुद्ध पंजाब-हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी मागील २० दिवसांहून अधिक दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनादरम्यान संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आंदोलनाच्या आत्महत्येमागील कारण त्यांच्या शिष्याने स्पष्ट केलेले आहे.
शिष्य गुलाब सिंह म्हणाले की, ”जेव्हा ही घटना घडली. तेव्हा भाई मनजित सिंह त्यांच्याशेजारी होते. ते ते बाबांचे राम सिंह यांचे हुजूरी सेवक होते. ते नेहमी त्यांच्यासोबत असतात. ८-९ डिसेंबर रोजी बाबाजींनी कर्नालमध्ये अरदास समागम आयोजित केला होता. ९ डिसेंबरला बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला ५ लाखांची देणगी दिलेली होती. त्यानंतर उबदार चादरींचे वाटपही केले होते. ते आंदोलनाच्या ठिकाणी रोज जायचे आणि डायरी लिहायचे. म्हणायचे मला दुःख पाहावत नाही.”
बुधवारी बाबा राम सिंह पुन्हा आंदोलनातून बाहेर आल्यानंतर बाबा राम सिंह गाडीत बसलेले होते. त्यांनी एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी लिहिले की, ”शेतकरी आंदोलनामुळे दुःखी होऊन अनेक बांधवांनी आपली नोकरी सोडली आहे. आपल्याला मिळालेले मान-सन्मान परत केले आहेत. अशा परिस्थिती मी माझे शरीर या आंदोलनाला समर्पित करत आहेत.” त्यांच्याकडील पिस्तूल कारमध्ये पडलेले होती, तेच घेऊन त्यांनी स्वतःला शहीद करून घेतले.