महाराष्ट्र केसरी स्पर्धा : हर्षवर्धन, सिकंदरची विजयी सलामी

0

पुणे : माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व संभाव्य विजेता सिकंदर शेख यांनी आपापल्या लौकिकास साजेसा खेळ करीत 65व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी देत आपल्या अभियानास प्रारंभ केला. मात्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला सलामीलाच सिंकदरसारखा तगडा प्रतिस्पर्धी मिळाल्याने पहिल्या फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले.

कोथरुड येथील कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांनी गादी विभागातून, तर शुभम शिदनाळेने माती विभागातून आगेकूच केली. बुधवारी स्पर्धेच्या दुसऱया दिवशी गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या पहिल्या लढतीत 2019मधील महाराष्ट्र केसरी विजेता व नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने नगरच्या सुदर्शन कोतकरला 3-0 असे पराभूत केले. पहिल्या दीड मिनिटात दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली. त्यानंतर मात्र सुदर्शन कोतकरला कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. मात्र तो गुणांची कमाई करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला 1 गुण बहाल करण्यात आला. दुसऱया फेरीतदेखील सुदर्शन कोतकरला ताकीद देण्यात आली. या वेळीदेखील तो गुण मिळविण्यासाठी अपयशी ठरला. या वेळी हर्षवर्धनने हफ्ते डावावर एका गुणाची कमाई केली. त्यानंतर हर्षवर्धनने सुदर्शनला आखाडय़ाबाहेर ढकलत आणखी एक गुण कमावताना लढत जिंकली.

गादी विभाग कल्याणच्या नरेश म्हात्रेने वाशीमच्या वैभव मानेला 4-2 असे पराभूत केले. नरेशने पहिल्या फेरीतच झटपट 3 गुणांची कमाई केली. दुसऱया फेरीत वैभवने आक्रमक खेळ करताना पहिल्या 15 सेपंदांतच नरेशला आखाडय़ाबाहेर ढकलत 1 गुण मिळविला. मात्र पुढील 15 सेपंदांत नरेशने वैभवला मॅटच्या बाजूला ढकलताना 4-1 अशी आघाडी वाढविली. मग वैभवने जोरदार प्रतिआक्रमण केले; पण त्याला केवळ एकच गुण मिळाला. शेवटी नरेशने या लढतीत बाजी मारली.

माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व संभाव्य विजेता सिपंदर शेख यांनी आपापल्या लौकिकास साजेसा खेळ करीत 65व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी देत आपल्या अभियानास प्रारंभ केला. मात्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला सलामीलाच सिंकदरसारखा तगडा प्रतिस्पर्धी मिळाल्याने पहिल्या फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.