मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा तिसरा सन 2022 – 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 11) विधानसभेत सादर केला.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे –
# हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
# संभाजी महाराजांचे स्मारक हवेली येथे उभारणार. 25 कोटी रुपयांची तरतूद
# राज्यातील 306 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सक्षमीकरणासाठी हजारो कोटींची घोषणा
# पिक कर्ज वाटपात वाढ
# नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना 50 हजारांएवजी 75 हजारांचे अनुदान
# गोसेखुर्द प्रकल्पाची सर्व कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार
# पुढील दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
# कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी
# जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांची तरतूद
# यावर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लावण्याचे उद्दिष्ट
# देशी गायी आणि म्हशींची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न
# किनारी भागातील मासळी उत्पादन करणा-या केंद्रांची देखभाल करणार
# मुंबईतील पशुवैद्यकीय रूग्णालयाला 10 कोटी रुपये निधी
# प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प
# सदृश पशुधनासाठी तीन फिरत्या प्रयोगशाळा
# आरोग्य सेवांवर येत्या तीन वर्षात 11 हजार कोटींचा खर्च करणार
# येत्या तीन वर्षात शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेशिवाय किडनी स्टोन काढण्याची उपचार पद्धती सुरु करणार. त्यासाठी 17 कोटी पेक्षा अधिक निधी
# मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा
# विदर्भ, मराठवाड्यात कापूस सोयाबीन शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न
# दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार.
# आरोग्यासाठी तीन हजार 800 कोटी रुपयांची तरतूद
# आठ कोटी रुपयांची आठ मोबाईल कर्करोग निदान वाहने पुरवणार
# टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड मधील खानापूर येथील जमीन देणार
# प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसिन रुग्णालय उभारणार. तीन हजार 183 कोटींचा निधी
# पुणे शहरात तीनशे एकर क्षेत्रावर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध होणार
# प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार
# पाच हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देणार
# मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपये
# महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, क्रांतिसिंह नाना पाटील, तसेच थोर समाजसुधारकांच्या जन्म गावातील शाळाच्या सुधारणेसाठी निधी
# थोर समाजसुधारकांच्या नावाने प्रबोधन केंद्र सुरु करणार
# भीमा कोरेगाव विजय स्तंभ येथील सोयी सुविधा आणि विकासाची कामे करणार
# गटार सफाई यंत्रचलीत पद्धतीने होणार
# तृतीयपंथीयांना ओळखपत्रे, रेशनकार्ड देण्याची विशेष मोहीम राबवणार
# शालेय शिक्षण विभागासाठी दोन हजार 354 कोटी रुपये
# क्रीडा विभागासाठी 354 कोटी रुपये
# आदिवादी विकास विभागाला 11 हजार 999 कोटी रुपये
# सामाजिक न्याय विभागाला 2 हजार 876 कोटी रुपये
# आश्रम शाळांसाठी 400 कोटींचा निधी
# महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 472 कोटी रुपये
# पुणे रिंगरोडसाठी एक हजार 700 रुपयांचा निधी
# समृद्धी महामार्ग 77 टक्के काम पूर्ण. समृद्धी महामार्ग गोंदिया, गडचिरोली पर्यंत वाढणार
# महिला शेतक-यांना अधिक अनुदान देणार
# मुंबईतील रस्ते आणि लोहमार्गावरील वाहतूक कमी करण्यासाठी जलवाहतूक सुरु करणार. जलमार्गासाठी 330 कोटी रुपये निधी
# एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्य आधार आहे. एसटीला एक हजार पर्यावरण पूरक बस उपलब्ध करून देणार. एसटी महामंडळाला तीन हजार तीन कोटी रुपयांचा निधी
# नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार
# राज्य वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत सक्षम झाले आहे.
# शिर्डी विमानतळाला 150 कोटी रुपये निधी
# इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी वाढली. सन 2025 पर्यंत पाच हजार चार्जिंग स्टेशन उभारणार
# मेग्नेटीक महाराष्ट्र अंतर्गत 98 गुंतवणूक करार. एक लाख 89 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
# कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाचे व्याज पूर्णपणे माफ करणार
# मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
# उर्जा विभागाला नऊ हजार 900 कोटींची तरतूद
# मुंबईच्या आजूबाजूच्या परिसराला जलमार्गाने जोडणार
# गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव
# रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटी रुपये
# महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, थोर समाजसेवक यांचा परिचय नवीन पिढीला होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे हेरीटेज वॉक सुरु करणार
# लोणावळा येथील टायगर पोइंट येथे सुविधा निर्माण करणार
# कामगार विभागासाठी एक हजार 400 कोटी रुपये
# पाणी विभागाला तीन हजार 223 कोटी रुपये
# कोकण विभागाला आपत्तीसाठी तीन हजार 200 कोटी रुपये
# 18 जलदगती, 24 , 14 कुटुंब न्यायालये उभारण्यासाठी निधी
# आठ कोटी 70 पेक्षा अधिक शिवभोजन थाळ्या उपलब्ध करून दिल्या
# राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 14 कोटी रुपये
# पर्यटन विभागाला एक हजार 704 कोटी रुपये
# सैन्य दल रुग्णालयांच्या धर्तीवर पोलिसांसाठी विशेशोपचार रुग्णालये उभारणार
# नक्षलग्रस्त भागातील पोलिसांच्या मासिक भत्त्यात दुप्पट वाढ
# गृह विभागाला एक हजार 896 कोटी रुपये निधी
# पंढरपूर देवस्थान विकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
# राज्यातील वन क्षेत्रात वाढ झाली. चंद्रपूर शहरात वन्यजीव बचाव केंद्र उभारणार
# मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. मराठी भाषा भवन मुंबईत उभारणार. 102 कोटी रुपये खर्च. गुढी पाढव्याला उद्घाटन
# मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव उभारणार
# शिवाजी महाराजांचे किल्ले, गनिमी कावे यांना जागतिक वारसा घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार
# पुण्यातील महात्मा फुले स्मारक विकासाठी 100 कोटी रुपये निधी
# कोल्हापूर येथील शाहू महाराज स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार
# जगनाडे महाजारांचे मावळ तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी
# महाराणी सईबाई स्मृतीस्थळासाठी निधी देणार
# जायकवाडी, गोसीखुर्द जलपर्यटनाला चालना देणार
# 24 हजार 35३ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प
# सीएनजीवरील कर 13.5 वरून तीन टक्के एवढा करणार
# राज्यात सीएनजी स्वस्त होणार
# सोन्यावरील मुद्रांक शुल्क माफ