महिंद्राची ७ सीटर ‘बोलेरो निओ’ गाडी लॉंच

0
पुणे :  ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने ‘बोलेरो निओ’ ही गाडी सादर केली व आपल्या ‘बोलेरो’ या अत्यंत यशस्वी अशा एसयूव्ही श्रेणीमध्ये नव्याने भर घातली. नवीन ‘बोलेरो निओ’ची ‘एन ४’ या प्रकारातील मॉडेलची किंमत ८.४८ लाख रुपये (एक्स-शोरूम ऑल इंडिया) इतकी आहे.
‘बोलेरो निओ’ सादर झाल्यानंतर, ‘बोलेरो एसयूव्ही पोर्टफोलिओ’मध्ये आता विद्यमान ‘बोलेरो’ मॉडेल आणि नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी दणदणीत, अस्सल, कोठेही जाण्याची क्षमता असलेले आणि तरीही आधुनिक व झोकदार असे नवीन ‘बोलेरो निओ’ मॉडेल, हे दोन्ही प्रकार उपलब्ध झाले आहेत.
‘एम अॅंड एम’च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाक्रा म्हणाले, ‘‘बोलेरो ब्रँडला निष्ठावान ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने लाभला आहे. नवीन ‘बोलेरो निओ’चे डिझाईन, तिची कामगिरी व तिच्यामधील प्रगत अभियांत्रिकी ही वैशिष्ट्ये बोलेरोच्या मूळ गुणसूत्रांशी व्यवस्थित जुळतात. ‘थार’ व ‘स्कॉर्पिओ’मध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘थर्ड जनरेशन चॅसिस’वर बोलेरो निओ बांधली आहे. महिंद्रा एमहॉक इंजिनवर ही गाडी चालते.नवीन ‘बोलेरो निओ’ची वैशिष्ट्ये- प्रीमियम इटालियन इंटिरिअर- आरामदायी ७ सीटर- स्पोर्टी स्पॉईलर- प्रगत १७.८ सेमी (७) टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
Leave A Reply

Your email address will not be published.