मुंबई : उद्योजक आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा कंपनीने पुणेकरांना नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. पुण्यातील चाकणमध्येनवीन कारखाना उभारण्यात आला आहे. यात इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत. कारखान्यात इलेक्ट्रीक बॅटरीअसेम्बली सेटअप तयार करण्यात आले असून जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्ट या कारखान्यातून बाहेरपडणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्राच्या या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रीक एसयुव्हीमधील ओरिजन सुटे भागही तयार केले जाणारआहेत.हा प्रकल्प भारतामधील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असून तब्बल 2.83 स्वेअर किलोमीटर इतकं त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे. चाकणमध्ये अगोदरच एसयुव्ही तयार करण्याचा महिंद्राचा कारखाना आहे.
अशात महिंद्रा ग्रुप येथे तब्बल 16 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याच 16 हजार कोटींपैकी 4500 कोटी रुपयांची गुंतवणूकपुण्यातील चाकणमध्ये असलेल्या या नव्या प्रकल्पात केली जाणार असल्याची माहिती आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीचे कारखानेहे ऑटोमॅटिक सेटअपमध्ये काम करतात. त्यामुळे येथे एक हजारांहून अधिक रोबोट्स काम करतील, अशी माहिती आहे.
या कारखान्यामध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रेस शॉपबरोबरच एआयवर काम करणारे बॉडी शॉप आणि पेटींगसाठी रोबोट्सची मदत घेतलीजाणार आहे. हे रोबोट बॉडी शॉप मॉनेटरिंग करतील. या कारखान्यामध्ये 4.0 जनरेशनचं तंत्रज्ञान असणार आहे. यात ऑटोनॉमसमोबाईल रोबोट्स आणि ओटोमेटेड गाईडेड व्हेईकर्सचा समावेश असेल.
तसेच कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या प्रोडक्टच्या चाचणीची सोयही असणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रोडक्ट वापरताना येणाऱ्याअडचणींची प्रात्यक्षिकं स्टिम्युलेशनच्या माध्यमातून प्रोडक्ट्सवर आजमावून पाहिली जाणार आहेत. पुण्यामध्ये आधीपासूनच महिंद्राकंपनीच्या एसयुव्ही प्रोडक्शनचं युनिट कार्यरत असताना आता त्यात ही नवी भर पडणार आहे.