ठेकेदारी पद्धत रद्द करून सफाई कामगारांना कायम करा अन्यथा तीव्र आंदोलन : कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे

0
भोसरी :  covid-19 मुळे सर्व सोळाशे महिला एकत्र आल्यास संसर्ग वाढेल यामुळे कष्टकरी कामगार पंचायत वतीने विभागावर आठ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते सफाई झाडलोट करणाऱ्या महिलांची विभागवार संवाद सभा हा उपक्रम सुरू केला असून या अंतर्गत नुकतेच भोसरी येथील महिलांची संवाद सभा घेण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये रस्ते साफसफाईसाठी सोळाशे महिला पुरुष कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत, गेली वीस वर्षापासून या महिला पुरुष रस्ते सफाई चे कामे करत आहेत, एखाद्या ठिकाणी कायम कामे असतील तर त्या ठिकाणी ठेकेदार पद्धत बंद करून कंत्राटी कामगारांना कायम केले पाहिजे, असे कामगार कायदा प्रमाणे नियम असताना देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र रस्ते साफसफाई घण कचरा प्रक्रियांमध्ये करोडोंचा मलिदा खाण्यासाठी अधिकारी ठेकेदार संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत, त्यामुळे गेली वीस वर्षापासून चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती केली जात नाही.
इतर सर्व विभागात भरती सुरू आहे परंतु चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती न केल्यामुळे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय दलित बहुजन समाजातील कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत आहे,  याबाबत मनपा आयुक्त राजेश पाटील यांना वेळोवेळी निवेदन देऊन  त्यांनी दखल घेतली नाही या मुळे  महानगरपालिकेवर  तिव्र आंदोलन करून आयुक्ताना जाब विचारु असा इशारा यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी भोसरी येथील संवाद सभेत दिला , या वेळी कष्टकरी जनता आघाडी उपाध्यक्षा मधुराताई डांगे,योगिता गाडेकर, नीलम खांदवे,आशा सोनावणे, सुषमा स्वामी, सुवर्णा सिरसाट आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्ते सफाईसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहे, यात संख्यबळा एवजी स्क्वेअर मीटर प्रमाणे रस्ते साफ करण्यासाठी निविदा मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी काढल्या आहेत या मुळे या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यासाठीच ठेकेदार अधिकाऱ्यांनी संगणमत करून या निविदा काढल्या आहेत.
या निविदेत संख्याबळ नसल्यामुळे ठेकेदार हे कमी मनुष्यबळाकडून जास्त कामे करून घेऊ शकतात, तसेच रस्ते साफ नकारता देखिल बिले काडू शकतात,या मुळे  सोळाशे महिलां पुरुषांपैकी पैकी काहीचा रोजगार जाण्याची शक्यता आहे,  कोविड सारख्या काळात सर्वजण घरात असताना सफाई कामगार महिलांनी आरोग्य सेवा दिली  आता त्यांना कामावरून कमी करु नये अशी महिलांची आग्रहाची मागणी आहे, यामुळे सोळाशे महिलांनी आंदोलन सुरू केले असून कोविड मुळे संसर्ग वाढू नये यासाठी सर्व सोळाशे महिलांचे विभागवार आंदोलन सुरु आहे , परंतु विभागवार आंदोलन करून निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे सफाई कामगार महिलांमध्ये संताप निर्माण झाला आहे, तातडीने दखल घ्या अन्यथा मनपासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.