हडपसरमध्ये मोठा अपघात; एकाचा मृत्यू

0

पुणे : येथील हडपसर परिसरात कंटेनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने दुचाकी आणि रिक्षाला धडक दिल्यामुळे रिक्षाचा चुराडा झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातामुळे पुणे – सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून अपघातातील वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कुटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा कंटनेर रिक्षावर पलटी झाला आणि रिक्षाचा जागीच चुराडा झाला. त्यामुळ या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन गंभीर जखमी झाले आहेत.

सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन समोरील लक्झरी आणि एसटी बसच्या थांब्यावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकांसह स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.