तेलंगणामध्ये मोठी दुर्घटना; 100 हून अधिक जखमी

0

हैदराबाद : तेलंगाणाच्या सूर्यापेट येथे 47वा राष्ट्रीय ज्युनियर कब्बडी स्पर्धेच्या प्रारंभाच्या सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. गॅलरी तुटल्याने जवळपास 1500 लोक खाली पडले असून 100 हून जास्त लोक जखमी झाले आहेत.

दुर्घटनेबाबत माहिती देताना सूर्यापेटचे एसपी म्हणाले की, अद्याप दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
जखमींवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, हा अपघात कमकुवत लाकूड आणि इतर साहित्याने बनवलेल्या संरचनेमुळे झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेचं खरं कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होईल.

स्थानिक माध्यमांनी दाखवलेल्या व्हिज्युअल्समध्ये गॅलरी कोसळल्यामुळे लोक खाली पडताना दिसून येत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅलरी कोसळल्यानंतर गर्दी खाली कोसळली आणि लोक खाली पडले. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर लगेचच अॅम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्या आणि इतर वाहनांमधून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सूर्यापेटच्या या मैदानात तीन गॅलरी उभारण्यात आल्या होत्या. प्रत्येक गॅलरीमध्ये जवळपास 5000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर मैदानात जवळपास 15 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था होती. देशातील 29 राज्यांमधून कबड्डीचे खेळाडू येथे आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.