पुणे पोलीस आणि ATS ची मोठी करवाई; NIA ला पाहिजे असणारे दोनजण ताब्यात

0

पुणे : देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून कोथरूड परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.तर एक आरोपी फरार आहे. पुण्यात एटीएसनी कारवाई केली आहे. एटीएससह पुणे पोलीसही या कारवाईत सहभागी आहेत.काल मध्यरात्री ही कारवाईकरण्यात आली आहे.

काल (दि. 18 ) पहाटे 2.45 वा सुमारास कोथरूड पोलिस स्टेशन बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील PC प्रदीप चव्हाण आणि PC अमोल नझन यांना पेट्रोलिंग करताना कोथरूड मधील 3 तरुणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांना  पकडले. जेव्हा त्यांनात्यांच्या घरझडतीसाठी नेले तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला . पोलिस पथक त्यांच्यापैकी दोघांना पकडण्यात यशस्वी झालेपण एक पळून गेला.

इम्रान खानमो. युनूस साकी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोघांना घराच्या झडतीसाठी नेले असता त्यांच्याकडील एक जिवंत राऊंड आणि 4 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला.

त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याने शहर पोलीस दलाने ही माहिती दहशतवाद विरोधी पथकालाकळवली.

वरील संशयीत हे NIA ला पाहिजे असून त्यांच्या अटकेवर 5 लाखांचे बक्षीस आहे.

त्यांचा कोणत्या दहशतवादी कृत्यामध्ये हात असू शकतो, हे लक्षात घेऊन ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळवण्यात आलीआहे.या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा त्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत. तपास यंत्रणा प्रकरणाचा अधिक तपास करतआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.