पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थायी समितीचा मोठा पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे अॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे. अद्याप काही एक सविस्तर सांगता येत नाही असं सांगितलं आहे. मात्र, पुणे अॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
अॅन्टी करप्शनच्या कारवाईत मोठा मासा गळाला लागल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या कारवाई सुरू असून काही वेळातच नावे समोर येणार आहेत. 9 लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. अॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या
लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. 9 लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. 2 लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.