भारतीय लष्कराची मोठी कारवाई ! चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा

0

जम्मू-काश्मीर : काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातल्या जालुरा भागात लष्कर ए तोएबाच्या एक आणि कुपवाडा परिसरात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलीसांना यश आलं आहे. हे तिन्ही अतिरेकी एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. यातला एक अतिरेकी हा पाकिस्तानी आहे.

काल (सोमवारी) रात्री हे एन्काऊंटर सुरु झालं होतं. त्याचा शेवट दोन्ही अतिरेक्यांच्या खात्म्यानं झाला आहे. अद्याप ऑपरेशन सुरूच आहे. कारण तिसऱ्या अतिरेक्याचा शोध जंगलात सुरु आहे. कुपवाडा परिसरातही चकमक सुरू आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. असं एएनआयने ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

दरम्यान, सोपोरच्या जालूर भागातील पाणीपुरा जंगलात दहशतवाद्यांवर कारवाई करत सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.